वेळनेश्वर हे महाराष्ट्रातील रत्नागिरीहून सुमारे 170 किमी दूर स्थित एक गाव आहे. येथील समुद्र तटामुळे या जागेचे नाव वेळनेश्वर पडले.
मंदिर आणि समुद्र तट असलेले हे गाव स्वच्छ, सुंदर आणि रमणीय आहे. येथील तट नारळांच्या झाडांनी भरलेले आहे. तटाजवळ महादेवाचे जुने मंदिर आहे. हे मंदिर शैव धर्माच्या रहस्यवादाने संबंधित आहे. येथील तटावर स्विमिंग आणि मोटर बोटचा मजा घेऊ शकता.
तसा हा बीच बराच मोठा असून येथे कमी गर्दी असल्यामुळे येथे अगदी शांत आणि रमणीय वातावरण असतं.
कसे पोहचाल
येथून जवळीक विमानस्थळ मुंबई असून येथून दुरी 290 किमी तसेच पुण्याहून 306 किमी दुरीवर आहे. मुंबईव्यतिरिक्त सर्व मोठ्या शहरांपासून बस व टॅक्सी घेऊन येथे पोहचू शकता. पुण्याहून खेड- सुरुर- सातारा- उबंरेज- कुंभारी घाट- चिपळूण-गुहागर ते वेळनेश्वर पोहचू शकता. गुहागर ते वेळनेश्वरची दुरी 16 किमी आहे.
येथून जवळीक रेल्वे स्थानक चिपळूण आहे. जे वेळनेश्वरहून 60 किमी दुरीवर स्थित आहे.