Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद

Ajintha
, शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (07:00 IST)
महाराष्ट्राला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात अनेक प्राचीन वास्तुकला आहे. ज्या आजदेखील भक्कम उभ्या असून इतिहासाची साक्ष देतात. त्यापैकीच एक आहे औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणी. अजिंठा लेणी मध्ये असलेल्या या गुफा अजिंठा गावामध्ये आहे. जे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. अजिंठा लेणींमधील गुफा या सन 1983 पासून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित आहे. तसेच या लोकप्रिय युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये 30 दगडी बुध्द लेणी पाहावयास मिळतात. 
 
उत्तर-मध्य महाराष्ट्र, पश्चिम भारतात स्थित आहे, जे आपल्या वॉल पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहे. ही मंदिरे औरंगाबादच्या ईशान्येला 107 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघर्णा नदीच्या खोऱ्यात 20 मीटर खोल डाव्या टोकाला अग्निमय दगडांचे थर पोकळ करून बांधण्यात आले आहेत.
 
अजिंठा लेणी इतिहास-
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्थापित अजिंठा लेणी मधील गुफा भारतीय कलेचा एक अद्भुत नमुना आहे. अजिंठा लेणीला भारतातील सर्वात प्रचीन ऐतिहासिक स्थळांपैकी एक स्थळ मानले जाते. 
सह्याद्रीच्या पहाडांवर स्थापित असलेल्या या 30 गुफांमध्ये कमीतकमी 5 प्रार्थना भवन आणि 25 बौद्ध मठ आहे. या गुंफांचा शोध आर्मी ऑफिसर जॉन स्मिथ व त्यांच्या दल व्दारा सन 1819 मध्ये केला गेला होता. घोड्याची नाल अकरा असलेली निर्मित ह्या गुफा अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व की है। या गुफांमध्ये बौद्ध धर्माचे चित्रण केले गेले आहे. तसेच अजिंठाच्या गुंफामध्ये भिंतींवर सुंदर, कोरीव अप्सरांचे व राजकुमारींचे विभिन्न मुद्रांमध्ये सुंदर चित्र कोरण्यात आले आहे. जे येथील उत्कृष्ट चित्रकला व मूर्तिकलाचे सुंदर नमुने आहे. तसेच याठिकाणी बौद्ध भिक्षु राहायचे आणि अध्ययन व प्रार्थना करायचेत. 76 मी. पर्यंत उंची असलेल्या या लेण्यांचा शोध इंग्रज इतिहासकार जॉन स्मिथ व्दारा घेण्यात आला होता.  
 
अजिंठा लेणीची वास्तुकला-
अजिंठा लेणींमधील गुफांमध्ये वेगवगेळ्या वास्तुकलांचे एकत्रीकरण आहे. येथील प्रवेशव्दारा जवळ  भगवान बुद्धांची एक विशाल दगडातून साकारलेली नक्षीकाम केलेली एक प्रतिमा पाहावयास मिळते. तसेच अनेक प्राचीन चित्रकला पाहावयास मिळते.  
 
तसेच औरंगाबाद जिल्ह्यात स्थापित असलेल्या अजिंठा लेणी पाहायला जायचे असल्यास तिथे शासनाने एक वेळ ठरवून दिली आहे. सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत तुम्ही पाहू शकतात. तसेच सोमवारी अवकाश असतो म्हणजे गुफा बंद असतात.  
 
अजिंठा लेणी गुफा औरंगाबाद कसे जावे?
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्थापित अजिंठा लेणी मधील गुफा औरंगाबाद पासून 100 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तुम्ही इथे कोणत्याही माध्यमातून सहज पोहचू शकतात. तसेच जर तुम्हाला विमानमार्गाने जायचे असल्यास औरंगाबाद विमानतळ इथून जवळ आहे. 
 
याशिवाय अजिंठा गुफा पाहायला रेल्वे मार्गाने जायचे असले तर जवळच औरंगाबाद किंवा जळगाव रेल्वे स्टेशन स्थित आहे. तसेच स्थानीय परिवहने देखील अनुरंगाबाद किंवा जळगाव वरून अजिंठा लेणी पाहवयास जाता येते.अजिंठा लेणीचा मार्ग औरंगाबाद आणि जळगावला जोडलेला आहे. खाजगी किंवा इतर वाहन, परिवहन बस ने सहज पोहचता येते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपंचमी निमित्त जोक्स मराठी