Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवनेरी

शिवरायांचे आठवावे रूप

शिवनेरी

सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर

पुण्यापासुन नव्वद किलोमीटरवरील शिवनेरी गडाला मोठे ऐतिहासिक महत्व आहे. शिवाजी महाराजांचा जन्म याच गडावर झाला. महाराजांचे बालपण येथेच गेले. स्वराज्याचे बाळकडू त्यांना याच गडावर मिळाले. त्या काळात हा किल्ला सर करणे अवघड होते.

त्यामुळेच शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजांनी शिवरायांच्या जन्मापूर्वी जिजाबाईंना शिवनेरी येथे पाठविले होते. गडावर शिवाई देवीचे देऊळ आहे. त्यावरूनच शिवाजी हे नाव ठेवण्यात आले.

गडावर जाण्यासाठी आता रस्ता आहे. जाताना सात कमानी लागतात. शिवाईचे देऊळ, शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, डोंगरमाथा, कडेलोट टोक, अंबरखाना पाहण्यासारखे आहे. गडाजवळ नाना घाट लागतो त्यावरून कोकण पठाराचे मोहक दृष्य दिसते. जीवधन नावाचा आणखी एक गड या गडापासून जवळच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi