Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र दिन घोषवाक्य मराठी Maharashtra Din Ghoshvakya

Maharashtra Din Ghoshvakya
, गुरूवार, 1 मे 2025 (06:36 IST)
मराठी भाषा आहे सक्षम, करण्या संस्कृतीचे रक्षण
 
मराठी भाषा गोड, वाढवी शिक्षणाची ओढ
 
मराठी ज्ञानाचा कल्पतरू, हात मराठीचा धरू
 
मराठीचे आद्यदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेवी
 
विकासाचे आणि प्रगतीचे महाद्वार, मराठीचा झेंडा अटकेपार
 
मराठी भाषा पोहचवू घरोघरी, नांदेल सर्वत्र ज्ञनाची पंढरी
 
मराठी आपली आण, बाण, शान 
मराठी आहे आपुला प्राण
 
अभंगाचा रचूनी पाया, संतांनी घडवली मराठीची काया
 
साहित्याचा हा खजिना, मराठी आपल्या सौंदर्याचा दागिना
 
महाराष्ट्र भारताची शान, गर्वाने उंचावते मान
 
महाराष्ट्र माझा, अभिमान माझा
 
शौर्य, संस्कृती आणि स्वाभिमान – महाराष्ट्राचा मान!
 
माझा महाराष्ट्र
एकता, प्रगती आणि परंपरेचा संगम
 
जय महाराष्ट्र, जय भारत
एक उर्जा, एक दिशा!
 
तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारा महाराष्ट्र
 
युवा घडवा, महाराष्ट्र घडवा!
 
शिकूया, संघटित होऊया, महाराष्ट्र घडवूया!
 
भाषा, जात, धर्म न पाहता – महाराष्ट्र आपला एकच आहे!
 
जिथे माणुसकी मोठी, तिथेच खरा महाराष्ट्र!
 
सर्वधर्म समभावाचा संदेश – महाराष्ट्राच्या मातीचा स्पंदन!
 
शेतकऱ्याच्या घामात – महाराष्ट्राची शान!
 
औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक – सर्वांगीण प्रगतीचा मार्ग: महाराष्ट्र!
 
स्वावलंबी महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत!
 
स्त्रीशक्तीचा जागर – प्रगतीचा आधार!
 
मुलगी शिकली, महाराष्ट्र पिकला!
 
पर्यावरणाचे रक्षण – महाराष्ट्राचे भविष्य!
 
भक्ती, शक्ति, संस्कृती – महाराष्ट्राची ओळख!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharashtra Day 2025 Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा