Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुष्काळाची भीषणता स्पष्ट करणारी आकडेवारी

दुष्काळाची भीषणता स्पष्ट करणारी आकडेवारी

वेबदुनिया

PR
महाराष्ट्रासमोर १९७१ नंतर सर्वात भीषण दुष्काळाचे संकट ठाकले असून या नैसर्गिक व मानवनिर्मित संकटावर मात करण्यासाठी प्रबळ इच्छा‍शक्तिसोबतच दीर्घकालीन नियोजन आखून प्रामाणिक अंमलबजाणी अपरिहार्य आहे. एकीकडे सरासरीइतका पाऊस होऊनही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असताना अवर्षणग्रस्त भागातील काही गावांनी वाळवंटात हिरवाई फुलवता येत असल्याचे दाखवून दिले आहे. भविष्यात राज्यावर असे संकट येऊ नये म्हणून आतातरी कंबर कसून प्रयत्नांची प्रामाणिक पराकाष्ठा करावी लागेल.

* केंद्र सरकारचे १२०७ कोटींचे पॅकेज जाहीर.
* सरासरीपेक्षा फक्त ५० ते ६० टक्के पाऊस.
* राज्यात एकूण ४५ हजार खेडी
* दोन तृतीयांश महराष्ट्र दुष्काळाच्या सावटात.
* ३४ जिल्ह्यातील १२ हजार खेड्यांची दुष्काळात होरपळ.
* राज्यातील ७४ तालुके कायम दुष्काळी.
* २५० तळ्यांपैकी १५० आटली.
* फेब्रुवारी अखेरपासून संपूर्ण राज्यात २१३६ टँकरने पाणीपुरवठा.

Share this Story:

Follow Webdunia marathi