दुष्काळाची झळ बसल्याने अखेर आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे काही सामने महाराष्ट्रात न होता बाहेरच्या राज्यात खेळविले जाण्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर आणि पुण्यातील ५ सामने राज्याबाहेर स्थानांतरित होऊ शकतात, असे संकेत आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिले आहेत.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयपीएल सामन्यांना परवानगी देऊ नये, यासाठी न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
न्यायालयाने बीसीसीआयची कानउघाडणी करीत मुंबई, पुणे आणि नागपुरात होणारे सामने राज्याबाहेर हलविण्यास सांगितले होते.
दरम्यान, आयपीएल फ्रॅन्चायझींना आयोजनात त्रास होण्याची शक्यता असल्याने नागपुरातील तीन आणि पुण्यात होणार्या दोन प्लेऑफ सामन्यांचे आयोजन इतरत्र होऊ शकते, असे संकेत शुक्ला यांनी दिले आहेत.