Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवडणूक काळात नौदल व तटरक्षक दलाचीही मदत

निवडणूक काळात नौदल व तटरक्षक दलाचीही मदत
विधानसभा निवडणूक काळात समुद्रकिनार्‍यालगत गस्त वाढवून बंदोबस्त ठेवण्यासाठी राज्य सरकार नौदल व तटरक्षक दलाची मदत घेणार आहे. त्यासाठी संबंधितांशी संपर्क साधून औपचारिक विनंती करण्यात येत असल्याची माहिती गृह विभागातील उच्च पदस्थांनी दिली. गेल्यावर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निवडणूक काळात घातपाती कारवाया किंवा हिंसाचाराच्या घटना होऊ नयेत, यासाठी गृह विभाग दक्ष आहे.

पाकिस्तानातील आयएसआयसारख्या संघटना दहशतवाद्यांना हाताशी धरून भारतावर व विशेषतः मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी करीत आहेत, असे गोपनीय संदेश आयबी, रॉ या गुप्तचर संघटनांनी वेळोवेळी राज्य सरकारला दिले आहेत. हा हल्ला समुद्र मार्गाने दहशतवाद्यांना पाठवूनच पुन्हा होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या सागरी किनार्‍यालगतच्या भागात डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi