Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पवार आले अन् सभा न घेताच गेले!

पवार आले अन् सभा न घेताच गेले!
सायंकाळी उशिरा सोनपेठ शहरावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे हेलीकॉप्टर घिरट्या घालत होते. बर्‍याच वेळ घिरट्या घातल्यानंतर ते बीडच्या दिशेने परत गेल्याने स्थानिक नेत्यांनी वेळ माररून नेली. अंधार असल्याचे कारण प्रचार समितीकडून सांगण्यात येत असले तरी शरद पवार यांचे विचार ऐकण्यास मिळाले नसल्यामुळे कार्यकर्ते हिरमुसले होते.

जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. बाबाजानी दुर्राणी व सुरेशराव वरपूडकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांची प्रचार सभा शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी सोनपेठ शहरात आयोजित करण्यात आली होती. प्रचारसभेची जोरदार तयारी करण्यात आल्यामुळे सभेला भरपूर गर्दी झाली होती. दुपारपासून कार्यकर्ते सभास्थळी गर्दी करून होते. सायंकाळी उशिरा एक हेलीकॉप्टर शहरावरून घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला होता; परंतू बर्‍याच वेळ घिरट्या घातल्यानंतर हेलीकॉप्टर बीड जिल्ह्याच्या दिशेने निघून गेले. सभास्थळी कार्यकर्त्यांत चलबिचल सुरू झाली.

सायंकाळचा अंधार असल्यामुळे हेलीकॉप्टर उतरण्यास अडचण येत असल्याचे कारण तसेच इंधन संपत आल्याचे कारण प्रचार समितीकडून सांगण्यात आले. त्यामुळे सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. यावेळी स्थानिक नेते आ. सुरेश देशमुख, सुरेश वरपूडकर, आ. बाबाजानी दुर्राणी यांची भाषणे झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi