शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे श्रध्दास्थान असून त्यांच्याशी माझे संबंध आजही चांगले आहेत. 'सामना'तून माझ्या विरोधात झालेले लिखाण हे बाळासाहेबांनी केलेले नसून त्यांच्या नावाने बाजारबुणगेच लिखाण करून मिरवित असतात, अशी टीका मनसे नेते राज ठाकरे यांनी केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी माजली असून मनसेने सर्वच पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. विशेषतः शिवसेनेसाठी मनेसे जण ठरू लागल्याने शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षासंदर्भात नेहमीच काही ना काही दापून येत असते. सामनातील एका अग्रलेखात राज यांना मराठी माणसाच्या फुटीस कारणीभूत ठरवून 'जिना' म्हणून संबोधण्यात आले आहे. हा लेख सामनाचे संपादक बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिला असल्याचे सांगण्यात आले असले तरीही राज यांनी बाळासाहेब यांनी हा लेख लिहिलाच नसल्याचे सांगून काही बाजार बुणग्यांनीच तो लिहिल्याचे म्हटले आहे.