माझा इतर भाषेंना विरोध नाही. मात्र महाराष्ट्रात पहिले प्रेम मराठीला मिळाले पाहिजे, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 'मराठी' हाच अजेंडा असल्याचे राज ठाकरे यांनी पुण्यात सांगितले.
मनसेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी पुण्यात केलेल्या इंग्रजी भाषणावरही टीका केली. ते म्हणाले,' माझ्या वडिलांचे मराठीबरोबरच उर्दू भाषा लिहिता व वाचता येत होती. त्यांचे हिंदी आणि संस्कृतही चांगले होते. माझाही इतर भाषेंना आपला विरोध नाही. आपणासही या भाषा आल्या पाहिजे. मात्र पहिले प्रेम मराठीलाच मिळाले पाहीजे'