काँग्रेस व भाजपामुळेच देशाचा विकास झाला नसून गरिबी, बेरोजगारी वाढल्याने परिवर्तन झाले नाही. त्यांनी ६२ वर्षे राज्य करुनही समस्या तशाच राहिल्या. त्यामुळे नक्षलवादी व गुंडात वाढ झाल्याची टीका, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी केली. पुणे येथील जाहीर सभेत सोमवारी दुपारी त्या बोलत होत्या.
या दोन्ही पक्षांनी देशाला सामाजिक विकासापासून दूर ठेवले. डॉ. आंबेडकरांनी घटनेद्वारे दिलेल्या आरक्षणास काँग्रेसने सोयीस्करपणे विरोध केला. असाच गंभीर प्रश्न उधवर्णियांसाठी आहे, असे त्या म्हणाल्या. या देशात सर्व वर्गातील लोक वाढल्या महागाईमुळे त्रस्त असून काँग्रेसच्या भांडवलदारांबरोबरच्या सख्यामुळेच महागाईचा भस्मासूर आल्याची टीकाही मायावतींनी केली.