काँग्रेसचे अ.भा. सरचिटणीस राहुल गांधी यांची गुरूवारी (ता.८ ) औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी एमजीएमच्या मैदानावर होणार्या या सभेला मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन काँग्रेस आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
राहुल गांधी याची औरंगाबादला ही पहिलीच सभा होत असल्याने या सभेचा सर्वसामान्यावर किती प्रभाव पडतो याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. याशिवाय राहुल गांधी मराठवाड्यात कळमनुरी येथे युवक काँगेसचे प्रदेशाध्यक्ष राजीव सातव यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत.