Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सट्टेबाजाराचीही आघाडीला पसंती

सट्टेबाजाराचीही आघाडीला पसंती

वेबदुनिया

मुंबई , बुधवार, 14 ऑक्टोबर 2009 (15:43 IST)
राज्यात मतदान संपल्यानंतर आता कोणाचे सरकार सत्तेवर येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी पैजा लागल्या असून निकालाची वाट पाहिली जात आहे. एक्झिट पोलमध्ये आघाडीचे वर्चस्व दिसून येत असताना सट्टेबाजाराची पसंतीही आघाडीच आहे. सटोडियांनी आघाडीला 65 पैसे दर दिला असून, भाजप-शिवसेना युतीवर 1 रुपया 30 पैसे लावले आहेत. सट्टा बाजारत ज्या पक्षावर लावलेली बोली कमी, तो स्पर्धेत पुढे असतो.

राज्यातील सट्टेबाजारात पक्षनिहाय अंदाजावर सट्टा लावला जात आहे. तसेच मातब्बर उमेदवारांवर पैसा लावाला जात आहे. कॉंग्रेसचे कृपाशंकरसिंह यांना 35 पैसे भाव दिला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष गोपाल शेट्टी याना 50 पैसे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिन अहीर यांना 90 पैसे दर दिला आहे. मनसेचे प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे आणि बाळा नांदगावकर या तिघांचा विजयही सट्टेबाजांने निश्‍चित केला आहे. भाजपच्या पूनम महाजनही सट्टेबाजाराच्य पसंतीत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi