मुसळधार पावसामुळे कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आल्याचे आज कॉग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी सोनिया पाच आणि सहा तारखेला महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सभा घेणार होत्या, आता त्या सहा आणि सात तारखेला महाराष्ट्रात सभा घेणार आहेत.
पक्षाने दिलेल्या माहितीनुसार सहा तारखेला सोनियांची नाशिक आणि नांदेडमध्ये सभा होणार आहे, तर सात तारखेला त्या जळगाव आणि जामनेर, बुलढाण्यात सभा घेतील.