Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वकीयांपासून स्वातंत्र्य मिळविण्याची वेळ- उद्धव

स्वकीयांपासून स्वातंत्र्य मिळविण्याची वेळ- उद्धव

वेबदुनिया

परकीयांपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अनेक आंदोलन केली. आता आपल्यावर स्वकीयांपासून स्वातंत्र्य मिळविण्याची वेळ आलेली आहे. ही निवडणूक म्हणजे अत्याचारी, अन्यायी काँग्रेस आघाडी सरकारच्या विळख्यातून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी गोरगरिबांनी छेडलेला आणखी एक स्वातंत्र लढाच आहे. आपल्या हक्काचे रक्षण करणारे सरकार सत्तेवर आणण्यासाठी केवळ शिवसेना-भाजप मुक्तीलाच मते द्या, असे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रामटेक येथील विशाल जाहीर सभेत केले.

रामटेक विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उमेदवार आशिष जयस्वाल यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आघाडी सरकारचा यथेच्छ समाचार घेतला. शेतकरी, गोरगरिब जनता आणि सुशिक्षित बेरोजगार यांचा विचार करणारे सरकार या महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांपासून अस्तित्वातच नाही. आपण सारेच सर्वसामान्य आहोत. आपला विचार करणारे सरकार सत्तेवर असावे, ही माझी रास्त अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करणे आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी आपल्याला या काँगे्रसी सरकारला आधी बाहेरचा रस्ता दाखवावा लागणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला करणार्‍या कसाबची हे सरकार हाजीहाजी करीत आहे आणि तिथेच आपल्या हक्कासाठी शांतीमोर्चा काढणार्‍या निरपराध शेतकर्‍यांच्या पाठीवर पोलिसांकरवी लाठ्या बरसवित आहे, अशी सणसणीत चपराकही त्यांनी हाणली.

Share this Story:

Follow Webdunia marathi