Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हुश्श !!! प्रचाराची बोंबाबोंब समाप्त

हुश्श !!! प्रचाराची बोंबाबोंब समाप्त

वेबदुनिया

महाराष्ट्रावर सत्तेत येण्यासाठी राज्यभर चाललेली प्रचाराची बोंबाबोंब अखेर आज सायंकाळी पाच वाजता संपली. आता मंगळवारी प्रत्यक्ष मतदान होणार असून त्यात राज्याची सत्ता कोणाच्या हाती द्यायची हे मतदार ठरवतील आणि त्याचा खुलासा तेवढा २२ जुलैला मतमोजणीतून होईल. अर्थात, आज प्रचार संपला असला तरीही मतदारांचे फिक्सिंग मात्र आगामी दोन दिवसातच होणार हे निश्चित.

प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी राज्यभर सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडाला होता. सर्वच नेत्यांनी शेवटच्या दिवशी सभांचा, रोड शोचा धडाका लावला होता. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सासवडमध्ये सभा घेतली आणि तो संपूर्ण पट्टा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. 'दलालांना' मत देऊ नका हा त्यांच्या भाषणाचा मुद्दा इथेही राहिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रभावाखालच्या मुंबईत सभा घेत मुंबईकर मतदारांना घुसळले. कायदा हातात घेऊ नये म्हणून सत्ता आपल्याकडे देत कायद्याच आपल्या हाती द्या असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही हजेरी लावली. पण प्रचारसभा न घेता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना पोहोचविल्या. राज ठाकरे यांना जनताच काय ते उत्तर देईल, असे सांगून त्या विषयावर बोलायचे टाळले.
राज्यात सर्वत्र उमेदवारांनी मोठमोठ्या मिरवणुका काढून शक्तीप्रदर्शन केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi