दारिद्रयरेषेखाली जीवन जगणार्यांना ३ रुपये किलो दराने गहू देण्याची घोषणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी केली. ही घोषणा पूर्ण होणारी नसून जनतेची फसवणूक करणारी आहे. त्याऐवजी जीवन वेतनाची संकल्पना पुढे आणायला हवी, अशी सूचना भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.