शिवसेनेचे पुण्यातील उमेदवार अजय भोसले यांच्या गाडीवर आज अज्ञात बंदुकधार्याने गोळी झाडली. यात भोसलेंचा चालक जखमी झाला आहे.
कोरेगाव पार्क परिसरात आज सकाळी ही घटना घडली. श्री. भोसले वडगाव शेरी मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आहेत. या हल्ल्यातून ते बचावले असून जखमी झालेल्या त्यांच्या चालकाला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आ ले आहे. यासंदर्भात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.