चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. मच्छिंद्र चाटे यांनी आज माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मनोहर जोशी यांनी त्यांचे स्वागत केले.
चाटे हे काही काळ लालूप्रसाद यादव यांच्या राजदमध्ये होते. महाराष्ट्राचे भले करण्यासाठी महाराष्ट्राला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या स्पष्ट आणि सडेतोड नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे प्रा. चाटे यावेळी म्हणाले.