मराठी माणूस आजही खंबीरपणे आणि एकजुटीने शिवसेनेबरोबरच आहे असा दावा शिवसेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. आघाडी सरकारने गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली आहेत. जनतेने त्यांना त्याचा हिशोब मागावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात आणि सभेत मार्गदर्शन करण्यासाठी आले असता जोशी यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यात शिवसेना भाजपला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शिवसैनिक मरगळ झटकून कामाला लागले आहेत. इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेना भाजप युतीमध्ये बड खोरी अतिशय कमी आहे. जे बंडखोर आहेत त्यांनाही माघार घेवून युतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन आम्ही केले आहे. ते जर ऐकत नसतील तर मात्र त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत.
उद्धव ठाकरे जे काम घेतात ते चोख करतात त्यामुळेच आर. आर. पाटील यांना त्यांची भीती वाटते त्यामुळे त्यांनी तसा आरोप केला असे ते म्हणाले.