कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा काळ या राज्यातील जनतेने दहा वर्षे बघितला आहे. आघाडीच्या सत्तेचा त्यांना आलेला अनुभव अतिशय वाईट आहे. त्यापेक्षा मुक्तीची पाच वर्षांची सत्ताच बरी होती, अशा प्रतिक्रिया जनतेची आहे. जनतेचा एकूण कल लक्षात घेता यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप मुक्तीचे सरकार सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे, असा विश्वास भाजपा नेते आणि खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी ही निवडणूक निर्णायक अशीच ठरणार आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या आणि विजेची टंचाई या दोनच मुद्दांभोवती ही निवडणूक फिरणार आहे आणि हे दोन्ही मुद्दे आघाडी शासनाच्या विरोधात आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना कधीही लोडशेडींग करण्यात आले नव्हते. उलट आपणच इतर राज्यांना विजेची विक्री करीत होतो. आता दहा ते बारा तास विजेविना राहावे लागते. मक्ुतीच्या सत्ताकाळात हागाई पूर्णपणे निमंत्रणात होती. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यात मुक्ती शासनाला यश आले होते. हा अनुभव आजही गावपातळीवर कथन केला जातो. गेल्या दहावर्षात महाराष्ट्रात १२ हजार शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले. यातही शोकांतिका अशी की, देशाचा कृषीमंत्री हा महाराष्ट्राचा असताना देशभरात आत्यहत्या करणार्या शेतकर्यांचे सर्वाधिक प्रमाण याच महाराष्ट्रात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.