राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर आसीन होण्याची महत्वाकांक्षा आपण कधीही बाळगली नसून ती बाळगण्यापेक्षा राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दशकभरापूर्वीचे कुशासन घालवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची भूमिका शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
युतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न उध्दव यांना विचारला असता त्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. आघाडी शासनाच्या काळात जनतेला भोगाव्या लागलेल्या हाल अपेष्टा मुख्यमंत्री होण्याच्या विषयापेक्षा मोठ्या असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.