Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युती अंतर्गत भांडणातच व्यस्त : विलासराव

युती अंतर्गत भांडणातच व्यस्त : विलासराव

वेबदुनिया

शिवसेना-भाजप युती अंतर्गत भांडणातच व्यस्त असून, यातून बाहेर येण्यास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास या पक्षांकडे वेळच नाही. काँग्रेसला पर्याय देण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले असले तरी भांडणातून वेळच मिळत नसल्याने पर्याय देण्यात त्यांना अपयश आले, अशी टीका माजी मुख्यमंत्री व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी केली.

दक्षिण नागपुरातील भांडे प्लाट येथे काँग्रेस उमेदवार दीनानाथ पडोळे यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार विलास मुत्तेमवार, काँगे्रसचे अखिल भारतीय सचिव मिर्झा बेग, माजी खा. गेव्हा आवारी, शहर काँग्रेस अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता व अन्य उपस्थित होते.

नागपूरची चौफेर प्रगती होत असल्याचे सांगून विलासरावांनी नागपूर भाग्यवान असल्याचे म्हटले. केंद्राच्या माध्यमातून जेएनएनयुआरएमअंतर्गत हजारो कोटी रुपये येथे येत आहे. अशावेळी आम्ही मनपात सत्ता कुणाची हा विचार केला नाही. नागपूरचा विकास झाला पाहिजे यादृष्टीने हा निधी देण्यात येत आहे. केंद्रातील युपीए व राज्यातील लोकशाही आघाडी सरकारने लोकांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहे, असेही ते महणाले.

विरोधी पक्ष भाजपात अंतर्गत भांडणे सुरू आहेत. रा.स्व.संघाला त्यात हस्तक्षेप करावा लागला अशी स्थिती भाजपाची झाली आहे, तर शिवसेनेत दोन भावांत जुंपली आहे. मराठी माणसाच्या भल्याचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत मराठी माणूस गुदमरला आहे. सर्वसामान्यांकडे लक्ष देण्यास यांना वेळ नाही. त्यामुळेच मतदारांसमोर विरोधी पक्ष पर्याय उभा करू शकला नाही. नागपूर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. लोकसभेनंतर आता विधानसभेतही काँग्रेसला बहुमाने विजयी करले, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi