Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्याच्या दयनीय अवस्थेला आघाडी जबाबदार- मुंडे

राज्याच्या दयनीय अवस्थेला आघाडी जबाबदार- मुंडे

वेबदुनिया

तुळजापूर , बुधवार, 30 सप्टेंबर 2009 (19:46 IST)
गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राची सर्व स्तरावर पिछेहाट झाली असून महागाई, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारीत वाढ यामुळे या दयनिय अवस्थेला राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केला.

भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रचाराची सुरूवात बुधवारी भवानी मातेचे दर्शन घेउन तुळजापुरात करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या मैदानाजवळ झालेल्या जाहीर सभेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नीतिन गडकरी आणि मुंडे यांनी प्रचाराचा नारळ वाढवला. यावेळी शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर, भाजपा उमेदवार सुभाष देशमुख, भाजप प्रदेश सरचिटणीस मधु चव्हाण, संजय निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंडे यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले,' काँग्रेस-राष्ट्रवादीला गेले दहा वर्ष संधी मिळाली, मात्र राज्यात सर्वच आघाड्यांवर अंधार आहे. भ्रष्ट, नाकर्त्या आघाडी सरकारला घरी बसविण्याची हीच वेळ असून नवा स्वावलंबी, सामर्थ्यशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजप-शिवसेना युती कटीबद्ध आहे.'

हे तर घोटाळ्यांचे सरकार -गडकरी
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दशवार्षिक योजनेत जनरेटर, इनव्हर्टर आणि हेलमेट बनविणार्‍या कं पन्यांचाच फक्त विकास झाला अशी बोचरी टीका प्रदेशाध्यक्ष नीतिन गडकरी यांनी केली. कोणतेही जनताभिमुख धोरण या सरकारकडे नाही, महाराष्ट्रात पंधरा हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या त्यांची दुःख पुसण्याऐवजी पटेलांनी सात हजार कोटींची विमाने एअर इंडियासाठी विकत घेतली. भारनियमनामुळे राज्यातील उोगांचेच नाही तर विार्थ्यांचेही नुकसान झाले हे सरकारचे सर्वात मोठे पाप आहे. मात्र युतीने जाहीर केलेला वचननामा अंमलात आणण्यासाठी युती वचनबद्ध आहे असे प्रतिपादनही गडकरी यांनी यावेळी केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi