Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वायव्य मुंबईत ६ पैकी ४ जगांवर काँग्रेस विजयी

वायव्य मुंबईत ६ पैकी ४ जगांवर काँग्रेस विजयी

वेबदुनिया

मुंबई- , शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2009 (12:33 IST)
महाराष्ट्रातील तेराव्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष वेधले होते. मतदारसंघ पुनर्रचना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी अर्थात रिडालोस, यांच्या अनपेक्षित यशामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदललेली दिसली.

मात्र वायव्य मुंबईत पुन्हा काँग्रेसचाच विजय झाला. वायव्य मुंबईत मतदारसंघ पुनर्रचनेनुसार जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगांव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम हे विधानसभा मतदार संघ आहेत. जोगेश्वरी मध्ये सेनेची जागा कायम राखत रवींद्र वायकर विजयी झाले. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे विमान आमदार भाई जगताप व मनसेचे संजय चित्रे उभे होते. शिवसेनेचा गोरेगावचा बालिकिल्ला ताब्यात ठेवण्यात सेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यशस्वी झाले आहेत. त्यांनी लढाऊ कामगार नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदराव यांचा पराभव केला.या दोन जागा वगळता,बाकी चारही जागा काँग्रेसने पटकावल्या आहेत.

वर्सोवा मधून बलदेवसिंह खोसा, अंधेरी पश्चिम मधून अशोक जाधव व अंधेरी पूर्व मधून काँग्रेसचे सुरेश शेट्टी तर दिंडोशी मतदार संघातून राजहंस सिंग यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावला.

Share this Story:

Follow Webdunia marathi