छत्रपती शिवजी महाराजांच्या नावाचा वापर राजकीय पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी करीत आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष लोकांच्या भावनांशी खेळत आहे, असा हल्ला कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी युतीवर चढवून महाराष्ट्रातील प्रचाराला प्रारंभ केला.
उत्तर महाराष्ट्रातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना सोनिया गांधी यांनी सांगितले की, राज्यातील विरोधी पक्षांकडे कोणताही विकास कार्यक्रम नाही. यामुळे जनभावना भडकविण्याचे काम विरोध पक्ष करीत आहे. त्याच हेतून शिवाजी महाराजांच्या नावाचा दूरउपयोग करीत आहे.
'कॉंग्रेस पक्ष हा विकासांवर मत मागणारा पक्ष आहे. आमच्या उमेदवारांना केलेले मतदान देश आणि राज्याच्या हिताचे आहे.
आम्ही जनतेमध्ये भाषा, धर्म आणि प्रदेशाच्या नावावर फुट पाडत नाही. आम्ही आमचे काम आणि धोरणांच्या आधारे मत मागत आहोत,' असे सोनिया गांधी यांनी भाषणात सांगितले.