ज्येष्ठ नेते अभ्यासक प्रा. एन .डी. पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूरात निर्माण झालेल्या डाव्या आघाडीमधील मुख्य घटक असलेले ज्येष्ठ नेते सदाशिवराव मंडलिक व खा. राजु शेट्टी यांच्यातच जागा वाटपावरुन मतभेद झाल्याने या आघाडीचे भवितव्य धुसर बनले आहे.
खा. मंडलिक यांनी आपल्या बालेकिल्ल्यात कागल येथे तर शेट्टी यांनी आपले बर्यापैकी प्राबल्य असलेल्या राधानगरी विधानसभा मतदार संघात परस्पर उमेदवारी जाहीर केले आहेत. दोघेही नेते आपल्या मतांवर ठाम असल्यामुळे ही आघाडी फुटण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे खुद्द राजू शेट्टी यांची कर्मभूमी असलेल्या शिरोळ विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाने, शेट्टी यांचे जातीय समीकरण अंमलात आणत ज्येष्ठ नेते सारेपाटील यांना उमेदवारी देऊन शेट्टींची गोची केली आहे. त्यामुळे एन.डी.पाटील आणि ऍड गोविंद पानसरे यांचे खा. शेट्टी आणि मंडलिक यांच्यातील दिलजमाईचे प्रयत्न फोल ठरण्याची शक्यता आहे.