ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांनी आपल्याला ठाण्यातून उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
मुळचे शिवसेनेचे असलेले प्रधान ठाण्याचे पहिले महापौर होते. पुढे शिवसेनेत बरीच वर्षे राहून खासदारकी उपभोगून त्यांचे नेतृत्वाशी पटले नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिथेही न पटल्याने नंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेशी घरोबा केला. पण ठाण्याच्या उमेदवारीवरून त्यांचे राज यांच्याशी वाजले आणि त्यांनी आज पदाचा राजीनामा दिला. ठाण्यात मनसेने राजन राजे या कामगार नेत्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रधान नाराज झाले आहेत. आपण नेतेपदाचा राजीनामा दिला आहे, पक्ष सोडलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.