मनसे आणि शिवसेनेने एकत्र येण्याची गरज काही दिवसांपूर्वी व्यक्त करणाऱ्या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आता ही आशा सोडून दिली आहे. उभय पक्षांनी सीमारेषा ओलांडल्याने त्यांचे एकत्रीकरण होण्याची आशा निमली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवडणूक प्रचारासाठी औरंगाबादेत आले असता त्यांनी हे मत व्यक्त केले. राज यांनी पक्ष सोडल्यानंतर या पक्षांच्या एकत्रीकरणाची थोडीफार आशा सर्वांनाच होती, परंतु आता खूप उशीर झाला असून, या पक्षांच्या एकत्रीकरणाचा विचारही करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राज यांच्यातील दरी वाढली असल्याचे या प्रसंगी जोशी सरांनी मान्य केले.