Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुजबळ कोठेही जाणार नाहीत पवारांच्या घरातील व्यक्तीचे व्यक्त केले मत

Bhujbal will not go anywhere
, शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (11:02 IST)
भाजपला सध्या खूप चांगले दिवस आहेत तर राज्यात शिवसेना जोरात आहेत. जो नेता, कार्यकर्ता आहे संधी मिळताच भाजपामध्ये किंवा शिवसेनेत प्रवेश करतो आहे. त्यात अनेक राष्ट्रवादीचे दिग्ग्ज नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत राहणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केला आहे. पुणे महानगरपालिकेत एका कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यानंतर प्रसार माध्यमाशी संवाद साधताना शिवसेनेत छगन भुजबळ जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली. कारण भुजबळ राष्ट्रवादी सोडतील असे चित्र होते मात्र भुजबळ यांनी कोणताही निर्णय अजूनही घेतला नाही, त्यात सुप्रिया सुळे यांनी असे मत व्यक्त केल्याने भुजबळ जाणार नाहीत का ? अशी चर्चा सुरु झाली आहे. 
 
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अनेक वर्ष आमच्या सोबत राहिलेले नेते मुलाच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी भाजप आणि सेनेत जात आहेत. तिथे गेल्यावर राज्याच्या विकासासाठी आम्ही या पक्षात आल्याचे सांगतात. हे पाहून किमान जनतेच्या हितासाठी तरी जात आहेत. एवढे ऐकून तरी मला समाधान मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील पंधरा वर्षात संघर्षच केला आहे. या निवडणुकीत संघर्ष करून पुन्हा उभा राहिल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता जागा वाटपाचा तिढा होणार, राष्ट्रवादी म्हणते १११ जागा घ्या