भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांसाठी जबाबदारी वाटप करण्यात आली आहे. यात अमित शाह यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांची नियुक्ती केली आहे. तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे सहप्रभारी म्हणून काम पाहतील. कर्नाटकातील माजी आमदार लक्ष्मण सावदी हे देखील सहप्रभारी म्हणून काम पाहतील. तर महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे याही कार्यरत असतील.
दिल्लीची जबाबदारी भाजपने माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर देण्यात आली आहे. यासोबतच माजी केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी आणि बिहारचे खासदार नित्यानंद राय यांना दिल्लीचा सहप्रभारी नेमण्यात आलंय. दिल्लीसाठी प्रदेश संघटनाची जबाबदारी श्याम जाजू यांच्यावर, तर सहप्रभारी तरुण चुघ यांच्याकडे आहे.
महाराष्ट्रासोबतच हरियाणाचीही निवडणूक होत असते. हरियाणामध्ये भाजपने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना प्रभारी नियुक्त केलंय. तर संघटनाचे प्रभारी म्हणून डॉ. अनिल जैन काम पाहतील.झारखंडमध्ये ओम माथूर यांना प्रभारी, तर नंद किशोर यादव यांना सहप्रभारी नियुक्त करण्यात आलंय.