Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

शिवसेनेत अंतर्गत वाद ३६ नगरसेवक, ३५० पदाधिकारी यांनी दिला राजीनामा

Internal dispute in Shiv Sena
, मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019 (16:36 IST)
नाशिक येथे शिवसेनेला मोठा जबर धक्का बसला आहे. यामध्ये नाशिक विधानसभा क्षेत्रातील असलेल्या पश्चिम मध्ये बंडखोरी केलेल्या शिवसेना नगरसेवक विलास शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांनी तसेच दोन महानगर व साडेतीनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक पश्चिम मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आज सकाळी साडे अकरा वाजता विलास शिंदे यांनी आपल्या गौरीशंकर कार्यालय सिडको येथे पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी ही निवडणूक लढत आहोत असे स्पष्ट केले आहे.
 
यामुळे भाजपच्या उमेदवार सीमा हिरे याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघातील लढत दुहेरी न होता आता तिरंगी होणार असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. या मतदारसंघात आता भाजपच्या सीमा हिरे, राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे, आणि अपक्ष उमेदवार विलास शिंदे यांच्यात खरी चुरस बघायला मिळणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विरोधक भांडत आहेत विरोधी पक्षासाठी - मुख्यमंत्री