उर्मिला यांचा राजीनामा नंतर कृपाशंकर सिह यांचा भाजपा प्रवेश निश्चित

बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (10:30 IST)
राष्टवादी काँग्रेस नंतर मुंबईत आता काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. उत्तर भारतीय यांचे नेते कृपाशंकर सिह यांनी देखील काँग्रेस सोडत भाजपाची वाट धरली आहे.  काँग्रेसमध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केलेल्या व उत्तर मुंबई मतदारसंघातून पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेस सोडचिट्ठी दिली आहे. काँग्रेस नेतेतर  कृपाशंकर सिंह यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. तसेच, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेसचे मतांचे मोठ्या प्रमाणत मुंबईत विभाजन होणार असून, उत्तर भारतीय मते भाजप कृपा शंकर यांच्या मार्फत पक्षाकडे वळवणार आहे. त्यामुळे आता मुंबईत आघाडीला मोठे नुकसान होणार असून, सक्षम उमेदवार शोध मोहीम  करावी लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख बुधवारी दिग्गज नेते करणार भाजपात प्रवेश