महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्याचं समजतं आहे. आज सकाळपासूनच आजच राष्ट्रपती लागू होईल अशी चर्चा सुरु होती. यासंदर्भातली शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. यानंतर दिल्लीतही कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रपतींनी प्रस्तावावर सही केली आहे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे