Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मतदानाला जाताय मग ही अकरा पैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा

मतदानाला जाताय मग ही अकरा पैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा
, सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (08:34 IST)
आज होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. 
 
मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी 11 पुरावे :  पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज (पीपीओ), खासदार,आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात मतदानासाठी वापरात आहेत 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट मशीन