Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gharapuri Island: घारापुरी बेट प्राचीन बारा ज्योर्तिलिंग

gharapuribet
शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (08:49 IST)
सौराष्ट्रातील सोमनाथ, श्री शैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुन, उज्जैन येथील महाकालेश्वर, नर्मदेच्या डोंगरावरील ममलेश्वर, संथाल परागण्यातील वैजनाथ, जुन्नर-खेडचे भीमाशंकर, दक्षिण भारतातील रामेश्वर, तीन लिंगाचा समावेश असलेले नागेश, वाराणशी येथील काशीविश्वेश्वर, नाशिकचे त्र्यंबकेश्वर, हिमालयातील केदारेश्वर, दौलताबादमधील घृष्णेश्वर अशी बारा ज्योर्तिलिंगे जगप्रसिद्ध आहेत. ऐतिहासिक, अद्भुत आणि शाश्वत ज्योतिर्लिंगे पाहण्यासाठी मोठ्या शिवभक्तांची नेहमीच गर्दी असते.
 
मुंबईपासून अवघ्या 10 कि.मी. अंतरावर घारापुरी बेट आहे. तेथे अतिप्राचीन बारा शिवलिंग आहेत. ठिकठिकाणी उत्खन्नातून आढळून आलेली छोटी-मोठी शिवलिंग इतिहासाची साक्ष देणारी आहेत. अशा या शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक, पर्यटकांची गर्दी उसळते. येथे अतिप्राचीन कोरीव लेण्याही पहावयास मिळतात. काळ्या दगडात कोरलेल्या या लेण्यांमध्ये शिवाची विविध रूपे दाखविण्यात आली आहेत. महेशमूर्ती, अर्धनारीश्वर, कल्याणमूर्ती, अंधकासुरवध, गंगावतरण, उमामहेश्वर मूर्ती, योगीश्वर आदी शिवाची विविध कोरीव ऐतिहासिक शिल्पे पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांही आवरर्जुन हजेरी लावतात.
 
महाशिवरात्री येथील प्रमुख लेण्यांच्या गाभार्‍यात प्रचंड शिवलिंग आहे. चारही दिशेने प्रवेशद्वार असलेल्या गाभार्‍यात शिवलिंगांच्या बाजूलाच शिवमूर्ती आहे. साधारणत: चार फूट उंचीचे व चार फूट व्यासाचे हे शिवलिंग सर्वानाच आकर्षित करीत असते. या शिवलिंगाच्या बाजूलाच थंड पाण्याचा हौद आहे. या हौदाच्या बाजूला दोन फूट उंचीचे व तीन फूट व्यासाचे शिवलिंग आहे. मनोहारी शिवलिंगांच्या व मुख्य लेण्यांच्या पश्चिमेकडे असलेल्या अष्टमातृकांच्या गाभार्‍याशेजारी तिसरे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या प्रवेशद्वारावरच भग्न अवस्थेतील दोन पाषाणी सिंह पहारेकरी म्हणून उभे आहेत. मुख्य लेण्यांशिवाय येथे उपलेण्याकडे जाताना आणखी एक शिवलिंग दृष्टीस पडते. साधारणत: सध्या दोन मीटर घेराचे हे शिवलिंग भव्य सभामंडपात विराजमान आहे. मुख्य लेण्यांच्या डोंगराच्या विरोधात आणखी एक डोंगर आहे. या डोंगरातच ‘सीतागुंफा’ आहे. या गुंफा परिसरातही प्राचीन शिवलिंग विराजमान आहे. अशाप्रकारे घारापुरी बेटावर पुरातन ऐतिहासिक व चैतन्यमय व सजीव भासणारी बारा शिवलिंगे आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाशिवरात्री : शिवलिंग कशाचं प्रतीक आहे? शिवलिंगाची पूजा कोणकोणत्या धर्मात होते?