महाशिवरात्रीला महादेवांना प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय अमलात आणतात. परंतू अनेक उपाय असे असतात जे सर्वांसाठी सोपे नाही. अशात प्रस्तुत आहे महाशिवरात्री पूजनाची अत्यंत सोपी विधी. पूजा विधी सोपी असली तरी याचे फल असाधारण असणार कारण की मनोभावे पूजन केल्याने महादेव लवकरच प्रसन्न होतात. महादेव अत्यंत सरळ स्वभावाचे मानले गेले आहे म्हणून त्यांना सोप्या पद्धतीने देखील प्रसन्न केलं जाऊ शकतं.
वैदिक शिव पूजन - प्रभू शंकराची पूजा करताना शुद्ध आसनावर बसून आचमन करावे. यज्ञोपवित धारण करुन शरीर शुद्ध करावे. नंतर आसनाची शुद्धी करावी. पूजन-सामग्री यथास्थान ठेवून रक्षादीप प्रज्ज्वलित करावे. आता स्वस्ति-पाठ करावे.
स्वस्ति-पाठ -
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा:
स्वस्ति ना पूषा विश्ववेदा:
स्वस्ति न स्तारक्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति र्दधातु।
- यानंतर पूजनाचे संकल्प घेऊन गणपती आणि गौरी-माता पार्वतीचे स्मरण करुन पूजन करावे.
जर आपण रूद्राभिषेक, लघुरूद्र, महारूद्र इतर विशेष अनुष्ठान करत असाल तर नवग्रह, कळश, षोडश-मात्रका याचे देखील पूजन करावे.
संकल्प करत गणपती आणि माता पार्वतीचे पूजन करावे नंतर नन्दीश्वर, वीरभद्र, कार्तिकेय (स्त्रिया कार्तिकेयची पूजा करत नाही) आणि सर्प याचे संक्षिप्त पूजन करावे.
- यानंतर हातात बिल्वपत्र आणि अक्षता घेऊन प्रभू महादेवाचे ध्यान करावे.
प्रभूचे ध्यान केल्यानंतर आसन, आचमन, स्नान, दही-स्नान, तूप-स्नान, मध-स्नान आणि साखर-स्नान करवावे.
- यानंतर प्रभूंना पंचामृत स्नान करवावे. नंतर सुगंध-स्नान करवावे आणि शुद्ध स्नान करवावे.
आता महादेवाला वस्त्र अर्पित करावे. वस्त्रानंतर जानवं अर्पित करावे. नंतर सुगंध, अत्तर, अक्षता, फुलं, बिल्वपत्र अर्पित करावे.
आता महादेवांना विविध प्रकाराचे फळं अर्पित करावे. नंतर धूप-दीप लावावी.
हात धुऊन महादेवाला नैवेद्य दाखवावे.
नैवेद्यानंतर फळं, पान-नारळ, दक्षिणा अर्पित करुन आरती करावी.
- नंतर क्षमा-याचना करावी.
क्षमा मंत्र : आह्वानं ना जानामि, ना जानामि तवार्चनम, पूजाश्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर:।
या प्रकारे संक्षिप्त पूजन केल्याने देखील महादेव प्रसन्न होऊन सर्व मनोरथ पूर्ण करतात. घरात भक्तिभावाने सोप्या पद्धतीने पूजन केल्यावरही महादेव प्रसन्न होतात.
महाशिवरात्री शुभ मुहू्र्त
महाशिवरात्री तिथी - 11 मार्च 2021, बृहस्पतिवार
निशिथ काळ - 11 मार्च, रात्री 12 वाजून 6 मिनिटापासून ते 12 वाजून 55 मिनिटापर्यंत
प्रथम प्रहर - 11 मार्च, संध्याकाळी 06 वाजून 27 मिनिटापासून ते 09 वाजून 29 मिनिटापर्यंत
दूसरा प्रहर - 11 मार्च, रात्री 9 वाजून 29 मिनिटापासून ते 12 वाजून 31 मिनिटापर्यंत
तिसरा प्रहर - 11 मार्च, रात्री 12 वाजून 31 मिनिटापासून ते 03 वाजून 32 मिनिटापर्यंत
चवथा प्रहर - 12 मार्च, सकाळी 03 वाजून 32 मिनिटापासून ते सकाळी 06 वाजून 34 मिनिटापर्यंत
शिवरात्री पारण वेळ - 12 मार्च, सकाळी 06 वाजून 34 मिनिटापासून ते संध्याकाळी 3 वाजून 02 मिनिटापर्यंत
महाशिवरात्रीच्या दिवशी शुभ काळ दरम्यान महादेव आणि पार्वती देवीची पूजा केली पाहिजे. महाशिवरात्रीला रात्री चार वेळा शिव पूजन करण्याची पद्धत आहे.