Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

Mahashivratri 2025 Puja Time शिवलिंगावर जल अर्पण करण्याचा सर्वात शुभ मुहूर्त

Mahashivratri 2025 Puja Time
, बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (06:19 IST)
Mahashivratri 2025 Puja Time माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो. यंदा 26 फेब्रुवारी 2025 बुधवारी महाशिवरात्री सण साजरा केला जाईल. महाशिवरात्रीला 
 
आपण देखील शिवलिंगावर जल अर्पित करु इच्छित असाल तर 2 सर्वश्रेष्ठ मुहूर्त आहेत.
 
1. अमृत काल आणि चौघडिया:- अमृत काल सकाळी 07:28 ते 09:42 दरम्यान
2. प्रदोष काल :- शास्त्रानुसार प्रदोषकाल सूर्यास्ताहून 2 घडी (48 मिनिटे) असतो. कुछ विद्वान मतांतराने याला सूर्यास्तापासून 2 घडी पूर्व व सूर्यास्तापासून 2 घडी नंतर पर्यंत मानतात. यासह संधी काळ सुरू होतो. संध्याकाळी 06:17 ते 06:42 दरम्यान.
 
चार प्रहरांच्या पूजेची वेळ :-
1. रात्रीच्या पहिल्या प्रहर पूजेची वेळ- संध्याकाळी 06:19 ते रात्री 09:26 दरम्यान
2. रात्री द्वितीय प्रहर पूजा वेळ- रात्री 09:26 ते मध्यरात्री 12:34 दरम्यान (27 फेब्रुवारी)
3. रात्री तृतीय प्रहर पूजा वेळ - मध्यरात्री 12:34 ते मध्यरात्री 03:41 दरम्यान (27 फेब्रुवारी)
4. रात्री चतुर्थ प्रहर पूजा वेळ- पहाटे 03:41 ते सकाळी 06:48 दरम्यान (27 फेब्रुवारी)
 
महाशिवरात्री कशी साजरी करावी: -
महाशिवरात्रीच्या दिवशी बरेच लोक उपवास करतात. या दिवशी फळे खाल्ली जातात आणि अन्न सेवन केले जात नाही. या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते. शिवलिंगाचा अभिषेक म्हणून, शिवलिंगावर दूध, दही, मध, गंगाजल आणि बेलपत्राने अभिषेक करा. बेलपत्र, धतुरा, फुले इत्यादी अर्पण करावे. 
 
भोलेनाथाची पूजा करण्यासाठी, महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत. भगवान शिवाची मूर्ती किंवा शिवलिंग एका पायावर स्थापित करा. त्यांना फुले, तांदूळ, धूप, दिवे इत्यादी अर्पण करा.
'ॐ नमः शिवाय' हा मंत्र जप करा.
 
शिवकथा वाचा किंवा ऐका. या रात्री बरेच लोक जागरण करतात आणि भगवान शिवाच्या भक्तीत मग्न राहतात आणि भजन गातात. म्हणून, रात्री जागे राहून भगवान शिवाची पूजा करावी.
 
महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त निशिता काळात असतो. ही वेळ रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत आहे. शिवलिंगावर दूध, दही, मध, गंगाजल आणि बेलपत्राचा अभिषेक करा. शेवटी आरती करा आणि देवाला प्रार्थना करा.
ALSO READ: श्री शंकर आरती
तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवाला प्रार्थना करा.
 
खरंतर, महाशिवरात्रीशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. या व्रताच्या एका पौराणिक कथेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लग्न याच दिवशी झाले होते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, या दिवशी प्रभु शिवाने हलहल विष पिऊन जगाचे रक्षण केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Lord Shiva Names For Baby Boy In Marathi महादेव वरून मुलांची नावे