Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किती तारखेला साजरी होणार महाशिवरात्री? मुहूर्त आणि पूजा विधी

mahashivratri
, शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (09:11 IST)
महाशिवरात्री भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यासाठी शिवमंदिरांमध्ये जय्यत तयारी केली जाते. अनेकांच्या घरी रुद्राभिषेक आणि शिव उपासना केली जाते. शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. माघ कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि या दिवशी त्यांची तपश्चर्या सफल झाली आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला.
 
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला माता पार्वती आणि भगवान शंकराचा विवाह झाला होता. त्या दिवसाला महाशिवरात्री असे ओळखले जाते. याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती एकत्र भ्रमणाला निघाले होते.
 
महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांवर भगवान शंकराची कृपा कायम असते. या दिवशी शिवलिंगामध्ये भगवान शंकराचा वास असतो. जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधीवत पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात. त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यंदा महाशिवरात्री 8 किंवा 9 कधी आहे? शिवरात्रीच्या पुजेचा मुहूर्त काय आहे? जाणून घ्या
 
महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे?
पंचागानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला  8 मार्चला 2024  रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटानी सुरू होणार असून 9 मार्च 2024 सायंकाळी 6 वाजून 17 समाप्त होणर आहे.
 
शुभ मुहूर्त जाणून घ्या
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी सकाळी 9.57 पासून  सुरू होईल आणि 9 मार्च रोजी संध्याकाळी 6.17  पर्यंत चालेल. उदयतिथीनुसार 8 मार्चला महाशिवरात्री साजरी होणार आहे. यामध्ये 8 आणि 9 मार्चच्या मध्यरात्री 12.07 ते 12.55  मिनिटांपर्यंत निशीथ काल पूजा मुहूर्त असेल. दुसरीकडे, महाशिवरात्री व्रताचा पारण मुहूर्त सकाळी  6.38 ते  सकाळी 11.04  पर्यंत असेल.
 
महाशिवरात्री पुजेचा मुहूर्त
महाशिवरात्रीचा सकाळी पुजेचा मुहूर्त  - सकाळी 6.38 ते सकाळी 11.04
निशिथ काल मुहूर्त -  मध्यरात्री 12.07 ते 12.55  मिनिटापर्यंत (9 मार्च)
सायंकाळच्या पुजेचा मुहूर्त - सायंकाळी 6.25 ते रात्री 9.28
रात्रीच्या  पुजेचा मुहूर्त-  रात्री 9.28 ते मध्यरात्री 12.31
मध्यरात्रीच्या पुजेचा मुहूर्त - मध्यरात्री 12.31 ते 3.34 पर्यंत
पहाटेच्या पुजेचा मुहूर्त - पहाटे 3.34 ते सकाळी 6.37
 
(टीप :  वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल  कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sant Ravidas Jayanti 2024: संत रविदास यांचे सुविचार