Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाशिवरात्रीला चटकन बनवा चटक बटाटे

महाशिवरात्रीला चटकन बनवा चटक बटाटे
, शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (23:16 IST)
साहित्य- अर्धा किलो उकळलेल्या बट्टयांचे सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे केलेले, एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे, अर्ध्याचा लिंबाचा रस, एक लहान चमचा जीरे, 5 हिरव्या मिरच्या, तिखटं आवडीप्रमाणे, एक मोठा चमचा तूप किंवा तेल आणि चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर .
 
कृती – लोखंडी कढईत तूप किंवा तेल गरम करुन त्यात जीरे आणि हिरव्या मिरच्या घालाव्या. नंतर शेंगदाणे टाकावे. लगेच बटाटे घालून 2 मिनिट हलवावे. मीठ घालून जरा वेळ मंद आचेवर राहू द्यावे. नंतर आवडीप्रमाणे तिखटं घालून हलवावे. नंतर दाण्याचं कूट घालून फुल गॅसवर 2 मिनिट हालवत राहावे. नंतर लिंबाचा रस आणि वरुन कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवाजी महाराज जोखीम पत्करून गरिबांना मदत करायचे