Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mahashivratri 2023 शिव लिंगाष्टकम् स्तोत्रम् पाठ केल्याने जीवनातील सर्व अडचणींपासून मुक्ती मिळते

Lord Shiva
, बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (22:07 IST)
सर्वशक्तिमान देवाची उपासना केली तर कठीण प्रसंगाला तोंड देऊन प्रत्येक संकटावर विजय मिळवता येतो. जर तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात, करिअरमध्ये समस्या येत असतील आणि तुमच्यावर वाईट वेळ येत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर भगवान शिव लिंगाष्टकमचे पठण केल्याने तुम्हाला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. याला अत्यंत चमत्कारी आणि शक्तिशाली मानले गले आहे. शिवपुराणात देखील शिवलिंगाची पूजा करण्यासाठी लिंगाष्टकमसाठी सांगितले आहे. हा पाठ करण्याचे फायदे जाणून घ्या.
 
असे मानले जाते की शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करून लिंगाष्टकम स्तोत्राचा नियमित पाठ केल्यास व्यक्तीला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.
हे पठण केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. 
लिंगाष्टकम् स्तोत्र हे अत्यंत चमत्कारिक मानले जाते. हे पठण केल्याने सर्व संकटे काही वेळातच दूर होतात आणि वाईट काळही संपतो.
 
तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नसतील तर तुम्ही लिंगाष्टकम् स्तोत्राचे पठण करू शकता. भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे असे सांगण्यात आले आहे. शिव हे देवांचे दैवत आहेत. त्याच्या कृपेने सर्व दुःख क्षणात दूर होतात. ही एक धार्मिक श्रद्धा आहे की स्वतः देव देखील भगवान शिवाची स्तुती करतात.
 
ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गम् ।
जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥१॥
 
देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामदहं करुणाकरलिङ्गम् ।
रावणदर्पविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥२॥
 
सर्वसुगन्धिसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गम् ।
सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥३॥
 
कनकमहामणिभूषितलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गम् ।
दक्षसुयज्ञविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥४॥
 
कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गम् ।
सञ्चितपापविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥५॥
 
देवगणार्चितसेवितलिङ्गं भावैर्भक्तिभिरेव च लिङ्गम् ।
दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥६॥
 
अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गम् ।
अष्टदरिद्रविनाशितलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥७॥
 
सुरगुरुसुरवरपूजितलिङ्गं सुरवनपुष्पसदार्चितलिङ्गम् ।
परात्परं परमात्मकलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम् ॥८॥
 
लिङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरुवारच्या उपवासात चुकून देखील ही कामे करू नका, त्रास होऊ शकतो