Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तीळ कटलेट

तीळ कटलेट
साहित्य : 1/2 कप तीळ, 1/2 कप साबुदाणा, 300 ग्रॅम कच्ची केळी, 1 इंच आल्याचा तुकडा, 2-3 हिरव्या मिरच्या, 4 ब्रेड स्लाइस, 1 चमचा धनेपूड, 1/4 चमचा आमचूर पूड, 1/2 लहान चमचा डाळिंबाचे दाणे, तळण्यासाठी तेल. 
 
कृती: सर्वप्रथम साबुदाणा 2 तासांसाठी पाण्यात भिजत ठेवावा. कच्च्या केळींना उकळून त्याचे साल काढून मॅश करून घ्यावे. आलं व हिरव्या मिरच्या बारीक बारीक चिरून घ्याव्या. ब्रेड स्लाइसचे मिक्सरमध्ये टाकून चुरा करून घ्यावा. तेल, साबुदाणा व तिळाला सोडून बाकी सर्व सामग्री एकजीव करावे. फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून तयार सामग्रीला कटलेटचा आकार देऊन प्रत्येक कटलेटला साबूदाणा व तिळात गुंडाळून मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे. गरम गरम सर्व्ह करावे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकर संक्रांतीचा धार्मिक अर्थ