Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मकरसंक्रांती आणि उत्तरायण मध्ये काय फरक आहे?

मकरसंक्रांती आणि उत्तरायण मध्ये काय फरक आहे?
, सोमवार, 15 जानेवारी 2024 (09:21 IST)
तर चला माहित करून घेऊया मकरसंक्रांती आणि उत्तरायण मधील फरक :
मकरसंक्रांती 2024- अशी मान्यता आहे की जेव्हा सूर्य मकर राशित प्रवेश करतो तर तो उत्तरगामी होतो. त्यानंतर मग तो कर्क राशित प्रवेश करतो तेव्हा तो दक्षिणगामी होतो. ज्योतिषशास्त्र  नुसार उत्तरायणच्या वेळेस सूर्य उत्तरदिशेला गतीने जात असतो. तर दक्षिणायन वेळेस सूर्य दक्षिण दिशेला गतीने जात असतो. सूर्याच्या या क्रियेला उत्तरायण व दक्षिणायन म्हणतात. उत्तरायण सुरु असताना दिवस मोठा व रात्र  लहान असते आणि दक्षिणायनच्या वेळेस रात्र मोठी तर दिवस लहान असतो. सूर्य सहा महीने उत्तरायणमध्ये तर सहा महीने दक्षिणायनमध्ये राहतो.
 
मकरसंक्रांती आणि उत्तरायण मधील फरक :
* परंपरा नुसार मकरसंक्रांती दरवर्षी 14-15 तारखेला येते. 
* भारतीय मान्यतेनुसार मकर राशीत सूर्य उत्तराषढा नक्षत्राच्या अंतिम तीन चरणात, श्रवण नक्षत्राच्या चारही चरणात आणि धनिष्ठा नक्षत्राच्या दोन चरणात भ्रमण करतो. म्हणजे ते उत्तरायण असते. 
* अशी मान्यता आहे की, सूर्याचे उत्तरायण मध्ये असणे म्हणजे मोक्षाचे द्वार उघडते.
* पितामह भीष्म जेव्हा युद्धात शरीराने क्षत-विक्षत झाल्यावर सुद्धा मृत्यु शय्येवार असताना प्राण जाण्यासाठी सूर्याचे उत्तरायण मध्ये प्रवेश होण्याची वाट पाहत होते. 
* जूलियन कॅलेंडरनुसार 23 डिसेंबरलाच सूर्य उतरायणचे योग बनतात. परंतु भारतीय पंचाग नुसार ही तिथि 14 जानेवारीला येते.
* 22 डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस असतो आणि या दिवशी रात्र  मोठी असते. या दिवसाला विंटर सोलस्टाइस म्हटले  जाते.
* काही वर्षाच्या अवधीत  विंटर सोलस्टाइसने ठरवलेले दिवस बदलतात पण वर्षाच्या या छोटया दिवसाची नोंद 20 ते 23 डिसेंबरच्या मध्ये असते. 
* वेगवेगळ्या  देशांमध्ये या दिवशी वेगवेगळे सण साजरे केले जातात. 
*  विंटर सोलस्टाइस येते तेव्हा भारतात मलमास चालू असतो. ज्याला संघर्ष काळ म्हटला जातो. 
* 22 डिसेंबर पासून भारतातील राजस्थान राज्यातील काही भागात पौष उत्सव सुरू होतो.
* सूर्याचे उत्तरायण मध्ये प्रवेश प्रक्रिया विंटर सोलस्टाइस पासूनच सुरू होते. म्हणजे सूर्य उत्तरायण होणे 22 किंवा 23 डिसेंबरलाच होते. 
* मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य स्पष्टरित्या उत्तरायण गमन दिसायला लागतो. 
* उत्तरायण सुरू असताना शिशिर, वसंत, ग्रीष्म ही ऋतू असतात तसेच या दरम्यान वर्षा, शरद, हेमंत हे तीन ऋतू पण येतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Makar Sankranti 2024:मकर संक्राति शुभेच्छा संदेश