Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

किंक्रांत 2024: किंक्रांतला काय करू नये जाणून घ्या

Kinkrant 2024
, मंगळवार, 16 जानेवारी 2024 (09:13 IST)
किंक्रांत 2024:संक्रांतीचा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी भोगीची भाजी,बाजरीची भाकरी असा बेत केला जातो. भोगीचा पुढचा दिवस मकर संक्रांति असते. या दिवशी सवाष्ण बायकांना बोलवून हळदी कुंकू  समारंभ करून इच्छेनुसार सवाष्णींना वाण दिले जाते. लहान मुलांचे बोरन्हाण देखील या दिवशी केले जाते.संक्रांतीच्या दिवशी आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा आणि स्त्रियांना वाण देऊन  'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याच्या शुभेच्छा देतात.
 
मकर संक्रांति चा दुसरा दिवस किंक्रांत किंवा करिदिन म्हणून साजरा केला जातो. 
या दिवशी कोणतेही शुभ काम करणे निषिद्ध मानले आहे. या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचे वध केले होते. देवीआईची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही ठिकाणी प्रवास करत नाही. दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गाई- बैलांना स्नान घालून त्यांची पूजा करून गोडधोडाचा जेवण देतात आणि संध्याकाळी गावात मिरवणूक काढतात. या दिवशी देखील बायका हळदी कुंकू करतात. संक्रांतीचा सण रथसप्तमी पर्यंत साजरा केला जातो. बायका हळदी- कुंकूचा समारंभ रथ सप्तमी पर्यंत करतात. 
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

15 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, 3 राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल