Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Makar Sankranti 2023 Wishes in marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

makar sankranti 2023
मकर संक्रांतीच्या निमित्ताने
सुख, समृद्धी आणि समाधानाने 
तुमचे आयुष्य उजळून निघो हीच इच्छा 
उत्तरायणाच्या शुभेच्छा
 
हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात 
आशेची किरणे घेऊन येवो 
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमचे आयुष्य सूर्याच्या किरणांप्रमाणेच 
सुखाने आणि भरभराटीने भरून जावो
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
उत्तरायणाच्या शुभेच्छा
 
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात
तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा येऊ दे
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
गूळ आणि तीळाचा गोडवा
आकाशात उडणारे उंच उंच पतंग
या मकर संक्रांतीला 
तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
थंडीच्या कडाक्यात उठून
मस्त आंघोळ करुया 
मग गरमागरम गूळपोळी खाऊया
पतंगबाजीचा आनंद लुटूया
एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊया
 
रंगीबेरंगी पतंगांसोबत मन ही झालं बाजिंद
संक्रातीचा सण चला करूया आनंदाने साजिरं 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
तीळ आणि गुळाप्रमाणे
आयुष्यात गोडवा पसरवूया
चला मकर संक्रांत साजरी करूया
 
पतंगाप्रमाणे उंच भरारी घ्या
तुमच्या स्वप्नांना नवीन रंग द्या
मकर संक्रांतीला हार्दिक शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Makar Sankranti 2023 Special Recipe: तिळगुळ लाडू, रेसिपी