Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi
, बुधवार, 7 जानेवारी 2026 (07:48 IST)
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
तीळ आणि गूळ एकत्र येऊन जसा गोडवा निर्माण होतो, 
तसाच हा सण आपल्या नात्यात गोडवा आणो
नव्या वर्षाच्या पहिल्या सणात 
तुम्हाला आनंद, आरोग्य आणि समृद्धी लाभो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
वर्षाचा पहिला सण करा भरभरून साजरा, 
तिळात गूळ मिसळा आणि जिभेवर येऊ द्या गोडवा. 
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
 
आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना पाहून मन प्रसन्न होतं
हा मकर संक्रांतीचा सण तुमच्या आयुष्यातही रंग आणि आनंद भरून आणो
सूर्याच्या उत्तरायणाने नवीन ऊर्जा येवो आणि स्वप्ने पूर्ण होवोत
हार्दिक शुभेच्छा!
 
रंगीबेरंगी पतंगांसोबत मन ही झालं बाजिंद, 
आज संक्रांतीचा सण चला करूया साजरा. 
हार्दिक शुभेच्छा!
 
पतंगाप्रमाणे उंच भरारी मारून 
तुम्हीही तुमच्या स्वप्नांना घाला गवसणी. 
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
 
गोड गुळाला भेटला तीळ, 
उडाले पतंग रमले जीव. 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
मकर संक्रांतीला पतंग उडवतो तसे 
तुम्हीही तुमच्या ध्येयांना उंच भरारी द्या
हा सण नवीन प्रेरणा आणि यश घेऊन येवो
मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा!
 
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या 
प्रियजनांना गोड गोड शुभेच्छा! 
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
 
तिळगुळाच्या गोडव्यासारखं 
आपलं कुटुंब एकत्र राहो. 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गोड नाती, गोड सण, 
तुम्हाला मिळो खूप समृद्धी आणि धन
तिळगुळ घ्या गोड बोला!
 
तीळ-गूळ एकत्र येऊन गोड होतात, 
तसे आपले कुटुंब नेहमी प्रेमाने आणि एकजुटीने राहो
हा संक्रांतीचा सण घरात सुख-समृद्धी आणि आनंदाची बरसात करो
पतंग उडवा, हलवा खा आणि सर्वांना गोड बोलून आनंद द्या! 
हार्दिक शुभेच्छा!
 
संक्रांतीचा सण घेऊन आला नवचैतन्याची खाण! 
हार्दिक शुभेच्छा!
 
तिळात मिसळला गूळ, 
त्याचा केला लाडू, 
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू. 
शुभेच्छा!
 
मकर संक्रांती म्हणजे नवीन सुरुवात! 
जुन्या वर्षातील दुःख विसरून 
नव्या वर्षात नवीन स्वप्ने जोडा
तुमच्या जीवनात यश आणि 
सुखाचे नवे रंग भरले जावोत
मित्र-कुटुंबासोबत तिळगूळ वाटून हा सण गोड करा
शुभेच्छा!
 
यशाच्या शिखरावर पतंगाप्रमाणे उंच उंच जावो. 
हार्दिक शुभेच्छा!
 
मकर संक्रांती तुमच्या जीवनात 
आशेची किरणे घेऊन येवो. 
तिळगुळ घ्या आणि गोड बोला!
 
सूर्य उत्तरायणात येतो तेव्हा 
नवीन प्रकाश आणि ऊर्जा आणतो
हा सण तुम्हाला यश, आरोग्य आणि समृद्धी देऊन जावो
तिळगूळ घ्या, गोड बोला आणि नाती अधिक मजबूत करा
तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pongal 2026: पोंगलला कोणत्या देवाची पूजा केली जाते? मुख्य नैवेद्य काय?