Surya Arghya on Makar Sankranti 2025 दरवर्षी जानेवारी महिन्यात साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा एक सांस्कृतिक सण तर आहेच पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातूनही याला विशेष महत्त्व आहे. जेव्हा सूर्य देव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. यावर्षी 14 जानेवारी 2025 रोजी सूर्य सकाळी 9.03 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. या वर्षी मकर संक्रांतीला विषकुंभ योग आणि पुनर्वसु नक्षत्राचा योगायोग आहे. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींसाठी हे संयोजन खूप शुभ असू शकते. आता अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने काय फायदा होऊ शकतो? याबद्दल सविस्तर जाणून घ्या-
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला या पद्धतीने अर्घ्य द्यावे
मकर संक्रांतीचा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने विशेष पुण्य मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याच्या पद्धतीबद्दल जाणून घेऊया.
सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र धारण करावे.
सूर्योदयाच्या वेळी पूर्व दिशेकडून मुख करुन बसावे.
तांब्याच्या लोट्यात शुद्ध जल भरावे आणि त्यात लाल फुलं, कुंकु, अक्षता गूळ आणि तीळ मिसळावे.
जल वरील बाजूस उचलून सूर्याकडे करत मंत्र जप करावे.
ॐ सूर्याय नमः
ॐ आदित्याय नमः
ॐ भास्कराय नमः
ॐ गायत्री मंत्र
जल सूर्य देवाला अर्पित करावे. पाण्याचा प्रवाह थेट सूर्यावर पडत असल्याचे लक्षात ठेवा.
अर्घ्य दिल्यानंतर सूर्य देवाचे दर्शन करावे.
आपल्या जागेवर तीन प्रदक्षिणा घालाव्यात, याला हे सूर्यदेवाच्या प्रदक्षिणा घातल्यासारखे मानले जाते.
शेवटी सूर्यदेवाची आरती पण करु शकता.
पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य देत पूजा करावी, याची विशेष काळजी घ्या.
तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचे काय नियम आहेत?
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना पाण्यात तीळ मिसळणे देखील शुभ मानले जाते.
सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर काही दान करणे देखील शुभ मानले जाते.
सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना आसनावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्या.
सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचे महत्त्व काय?
सूर्य देव हे सर्व देवांचे अधिपती मानले जातात. सूर्यदेवाला नियमित अर्घ्य दिल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने व्यक्तीभोवती सकारात्मक ऊर्जा पसरते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने आदर वाढू शकतो.