कृती: सर्वप्रथम साबुदाणा 2 तासांसाठी पाण्यात भिजत ठेवावा. कच्च्या केळींना उकळून त्याचे साल काढून मॅश करून घ्यावे. आलं व हिरव्या मिरच्या बारीक बारीक चिरून घ्याव्या. ब्रेड स्लाइसचे मिक्सरमध्ये टाकून चुरा करून घ्यावा. तेल, साबुदाणा व तिळाला सोडून बाकी सर्व सामग्री एकजीव करावे. फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून तयार सामग्रीला कटलेटचा आकार देऊन प्रत्येक कटलेटला साबूदाणा व तिळात गुंडाळून मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे. गरम गरम सर्व्ह करावे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा