मकर संक्रांतीचा सण सूर्याचे मकर राशीत प्रवेश करण्यावर निर्भर असत. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश होतो, तो दिवस म्हणजे मकरसंक्रांत असतो. या वेळेस सूर्य 14 जानेवारीला मध्यरात्रीनंतर 1 वाजून 27 मिनिटावर धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. म्हणून या वर्षी 15 जानेवारीला मकर संक्रांती साजरी करण्यात येणार आहे.
15 जानेवारीच्या दिवशी संक्रांतीचा पुण्यकाल सूर्योदयापासून संध्याकाळी 5 वाजून 16 मिनिटापर्यंत राहणार आहे. या अगोदर 2008ला सूर्य मध्यरात्रीनंतर 12 वाजून 9 मिनिटावर आला होता, तेव्हा 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला होता.
स्नान आणि दान
सूर्य जेव्हा मकर राशीत येतो, तेव्हा उत्तरायण होतो. या दिवशी सूर्याची आराधना- उपासना केली जाते. या दिवशी तीर्थात देखील स्नान-दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते. येणार्या 2019-20ला देखील 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येईल.
मकर संक्रांतीचे पौराणिक महत्त्व
पुराणात या दिवसाला वेग वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. असे म्हटले जाते की या दिवशी सूर्य आपले पुत्र शनीच्या घरी स्वयं जातो. आजच्या दिवशी गंगा राजा भगीरथच्या तपस्येमुळे पृथ्वीवर अवतरीत झाली होती.
श्रीकृष्णाने गीता म्हटले होते की जो व्यक्ती उत्तरायणात आपल्या शरीराचा त्याग करतो, त्याला पुनर्जन्म प्राप्त होत नसून हे लोकं ब्रह्मप्राप्ती करतात. भीष्म पितामहाने प्राण सोडण्यासाठी ह्याच दिवसाची निवड केली होती.