Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

1979 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच

1979 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच
, गुरूवार, 22 जानेवारी 2015 (16:09 IST)
1979 : विवियन रिचर्ड्‍स (वेस्टइंडीज, नाबाद 138 धावा)- वेस्टइंडीजच्या उत्कृष्ट क्रिकेटपटूंमध्ये एक असलेले विवियन रिचर्ड्‍स यांना  1979च्या वर्ल्डकप फायनलमध्ये नाबाद 138 धावांमुळे 'मॅन ऑफ द मॅच' बनले.   
 
आपल्या काळातील रिचर्ड्‍सचा असा जलवा होता की प्रेक्षक फक्त त्यांची फलंदाजी बघण्यासाठी स्टेडियमवर जात होते. 7 मार्च 1952मध्ये  जन्म झालेल्या रिचर्ड्‍सने 1987मध्ये क्लॉइव लॉयड नंतर वेस्ट इंडीजचे कर्णधारपद सांभाळले आणि बर्‍याच वेळेपर्यंत त्याला जगातील   क्रिकेटमध्ये शीर्ष नंबरवर कायम देखील ठेवले.  
 
रिचर्ड्‍सने 121 टेस्ट सामन्यात 6540 धावा काढल्या ज्यात 24 शतक आणि 45 अर्धशतक होते. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांचा उच्चतम स्कोर 291 धावा राहिला. त्यांनी 187 वनडे मॅचमध्ये 6721 धावा काढल्या, ज्यात 11 शतक आणि 45 अर्धशतक सामील आहे. रिचर्ड्‍सचा  वनडेमध्ये उच्चतम स्कोर नाबाद 189 धावा आहे. त्यांनी ऑफ स्पिन गोलंदाजम्हणून टेस्टमध्ये 32 आणि वनडेमध्ये 118 विकेट घेतले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi